Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालकमंत्र्यांचा ‘जनसंवाद’; भाजपने केली ‘जन की बात’!

चिंचवड मतदारसंघात आमदार जगताप यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीचे निवारण

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शहरात भाजप आणि राष्ट्रवादी प्रचंड प्रयत्नशील आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्यातील पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात जनसंवाद, परिवार मिलन, पाहणी दौरे यांसारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कात जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करत असतानाच याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणजे बुधवारी अजित पवारांनी शहरात जनसंवाद घेतला त्याच्याच दुसऱ्या दिवशी भाजपकडून आमदार शंकर जगताप यांनी ‘ जन की बात ‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी विविध तक्रारीवर संवाद साधला.

अजित पवारांचा जनसंवाद कार्यक्रम चिंचवड विधानसभेत पार पडल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी “जन की बात” या संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. रहाटणी, काळेवाडी या भागामध्ये ज्योतिबा मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका विभागाशी संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. आलेल्या तक्रारीचे थेट अधिकाऱ्यांकडे विचारणा करत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना या कार्यक्रमात करण्यात आल्या. नागरिकांकडूनही या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. एका आठवड्याभ राची मुदत देत या तक्रारींचे पुन्हा एकदा सर्वेक्षण केले जाईल असे देखील आमदार जगताप यांनी सांगितले. अजित पवार यांच्या जनसंवाद कार्यक्रमाविषयी बोलताना जगताप म्हणाले, “अजित पवार हे मोठे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना शह देण्यासाठी मी कार्यक्रम घेत नाही. आम्ही महायुती म्हणूनच काम करतो.”‘ जन की बात’ मधून मी नागरिकांचं म्हणणं ऐकतो.” असेही जगताप यावेळी म्हणाले.

हेही वाचा –  ‘इंडिया ब्लॉकमध्ये सामील होण्याबाबत मनसेकडून कोणताही प्रस्ताव नाही’; हर्षवर्धन सपकाळांनी केले स्पष्ट

सातत्यपूर्ण नागरिकांशी संवाद – जगताप

आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं की, “आमदार झाल्यापासून लोकांशी संवाद हा माझा सातत्याने सुरू असलेला उपक्रम आहे. हा कोणाला उत्तर देण्यासाठी नाही, केवळ योगायोग आहे.” त्यांनी सांगितलं की, आतापर्यंत “आमदार आपल्या दारी” या माध्यमातून १३ मेळावे घेतले असून हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. आता प्रत्येक प्रभागात “जन की बात” अंतर्गत थेट नागरिकांशी संवाद साधून अडचणी सोडवल्या जात आहेत. नगरसेवक नसल्याने नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. “त्या सोडवण्यासाठी आम्ही थेट लोकांशी संवाद साधत आहोत. यातून लोकांची सेवा हेच उद्दिष्ट असल्याचे जगताप म्हणाले..

पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय रंग चांगला चढणार असल्याचे दिसत आहे. यातच भाजपचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या चिंचवड मतदारसंघात तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसने “फोकस” केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी या मतदारसंघात भाजपानेच मुसंडी मारली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button