breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे
पुणे : लष्कराच्या मैदानाला नीरज चोप्राच्या नावाचा प्रस्ताव
पुणे – टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आणखी एक मोठा सन्मान होणार आहे. पुण्यातील (Pune) लष्कराच्या क्रीडा संस्थेच्या मैदानाला नीरज चोप्राचे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
नीरज हा लष्करात नाईक सुभेदार म्हणून कार्यरत आहे. भालाफेकीत कारकिर्द करत असताना सुरवातीच्या काळात नीरजने पुण्यातील या मैदानात सराव केलेला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहे यावेळी ते लष्करी क्रीडा संस्थेला भेट देणार आहेत त्या वेळी या मैदानाला नीरजचे नाव देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. या भेटीत राजनाथ सिंग सेनादलातील १६ ऑलिंपियन खेळाडूंचाही सत्कार करणार आहेत.