Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

गणेश मंडळांसाठी मोठी बातमी: सर्व परवानग्या मिळणार एकाच ठिकाणी; असा करा अर्ज

मुंबई | गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी महापालिकेची ऑनलाइन एक खिडकी कार्यपद्धती उद्या, सोमवारपासून सुरू होणार आहे. एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार असल्याने पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाची वेगळी परवानगी घ्यायची नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांकडून हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिकेने सन २०२३पासून पीओपी मूर्तीवर बंदी असल्याचे जाहीर केल्याने मूर्तिकार यंदा हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही पालिकेने मंडप परवानगीची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. सन २०२२साठी मंडळांना मंडप परवानगीसाठी १०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. मागील वर्षी ज्या मंडळांना परवानगी दिली होती, त्या मंडळांचे अर्ज यावर्षी ऑनलाइनने स्थानिक पोलिस ठाणे व वाहतूक पोलिस शाखेकडे न पाठविता मागील वर्षीच्या परवानगीच्या आधारे त्वरित परवानगी देण्यात येईल. त्यासाठी मागील वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

कुठूनही करा अर्ज

– ४ जुलैपासून अर्ज स्वीकारण्याची संगणकीय कार्यप्रणाली सुरू झाल्यानंतर अर्जदार विहीत कालावधीत कुठूनही, कधीही अर्ज करू शकतात.

– ऑनलाइन सुविधा बृहन्मुंबई महापालिकेच्या https://prtal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

– अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२२ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे.

– कोणत्याही अडचणींबाबत संबंधित सहाय्यक आयुक्त यांची मदत घेणे अपेक्षित आहे.

– मंडळांनी ऑनलाइन प्रणालीतून हमीपत्र डाऊनलोड करावे, त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या करून अपलोड करावे व अर्जासह सादर करावे.

……

मूर्ती असावी शाडूच्या मातीची

– जलप्रदूषणामुळे गणेशोत्सवात पीओपी मूर्तीची विक्री अथवा खरेदी करू नये

– शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी

– कृत्रिम तलावांमधील विसर्जनासाठी घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फुटांहून अधिक नसावी.

…..

यासाठीच पीओपी टाळा

– पीओपी पाण्‍यात विरघळत नाही. त्‍यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो.

– पीओपीमुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात.

– या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button