Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान! गॅस गिझर वापरताय; श्वास कोंडल्यामुळे तरुणाचा मृत्यू

नाशिक मधील सिडको -दौलत नगर येथील परिसरात राहणाऱ्या एका घरात बाथरूम मधील गॅस गिझर फुटल्याने एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गौरव समाधान पाटील या युवकाचा मृत्यू झाला आहे. युवकाचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार गौरव समाधान पाटील (२७) राधा वृंदावन अपार्टमेंट, दौलत नगर हा युवक दुपारी चार वाजेच्या सुमारास बाथरूम मध्ये असताना बाथरूम मधील गॅस गिझर अचानकपणे फुटला. त्यानतर, गौरवला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हा प्रकार त्याच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गौरव यास मयत घोषित केले. अंबड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button