TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) बससाठी वाहक अर्थात कंडक्टर कमी पडू लागल्यामुळे ६०० ड्रायव्हर्सना नवं ट्रेनिंग

 पुणे: ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) बससाठी वाहक अर्थात कंडक्टर कमी पडू लागल्यामुळे ६०० चालकांवर नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यानुसार आता चालक वाहकांच्या भूमिकेत दिसू लागले आहेत.

‘पीएमपी’ सध्या १६५० बसच्या माध्यमातून प्रवासी सेवा देत आहे. या बससाठी ४१०० वाहक असले, तरीही त्यांची संख्या अपुरी पडत आहे. अनेक वाहक सेवानिवृत्त झाले, तरी त्यांच्या जागी नवी भरती झालेली नाही. त्यामुळे बसच्या फेऱ्यांना फटका बसत होता. ‘पीएमपी’कडून त्यांच्या आणि ठेकेदारांच्या बसवर वाहकांची नेमणूक केली जाते. अलीकडे खासगी ठेकेदारांच्या बसची संख्या वाढत आहे. त्यामुळे चालकांची संख्या पुरेशी होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ‘पीएमपी’ने त्यांच्याकडे बदली, हंगामी आणि रोजंदारीवर कार्यरत; तसेच कायम सेवेत असलेल्या ६०० चालकांना वाहक बनविण्याचा निर्णय घेतला.

चालकांवर वाहकाची जबाबदारी सोपविण्यापूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांचा बॅच आणि बिल्ला काढणे गरजेचे असते. त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या आहेत. नव्या ६०० वाहकांना तिकीट काढणे आणि इतर गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार दोन महिन्यांपासून चालक वाहकाच्या भूमिकेत कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

भविष्यात पुन्हा चालकांची आवश्यकता भासल्यास वाहक म्हणून असेल तर ते पुन्हा चालक म्हणूनही काम करू शकणार आहेत. आता ‘पीएमपी’कडे चार हजार ७०० वाहक झाले आहेत. ‘पीएमपी’ने राखीपौर्णिमेच्या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी १८०० बस रस्त्यावर उतरवल्या होत्या. त्यासाठी नव्याने वाहक झालेल्यांची मोठी मदत झाली. त्यासाठी अनेकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ‘पीएमपी’ला राखीपौर्णिमेच्या दिवशी चांगला महसूल मिळाला.

पीएमपीमध्ये वाहक कमी पडू लागल्यामुळे ६०० चालकांवर वाहकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

पीएमपीच्या एकूण बस

१६५०

वाहकांची संख्या

४१००

चालकांची संख्या

२९५०

नव्याने झालेले वाहक

६००

दररोज सुट्टी द्यावी लागणारे वाहक

६७०

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button