breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

गुगलकडून भारतातील ३,५०० पेक्षा जास्त अ‍ॅप्सवर बंदी!

मुंबई : गुगलकडून भारतातील ३,५०० हून अधिक कर्ज देणारी अ‍ॅप्स बंद केली आहेत. या अ‍ॅप्सने धोरणांचे उल्लंघन केल्याने प्ले-स्टोअरवरून गुगलने काढून टाकले आहेत. टेक जायंट गुगलने ही कारवाई २०२२ मध्ये केली आहे. पण गुगलने ही माहीती २७ एप्रिल २०२३ ला आपल्या ब्लॉगमधून दिली आहे.

कंपनीने ब्लॉगमध्ये दिलेल्या माहीतीनुसार, २०२२ मध्ये धोरणांचे उल्लंघन केल्याने गुगल प्ले स्टोअरवर १४ लाख ३० हजार ॲप्स गुगलने रिलीज होण्यापासून रोखले आहेत. २०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीची फसवणूक आणि संशयास्पद व्यवहार असलेल्या १,७३,००० खात्यांवर कंपनीने बंदी घातली आहे.

आता कंपनी २०२३ मध्ये जाहिराती आणि गोपनीयतेबाबत कठोर नियम बनवणार आहे. भारतात २०२२ मध्ये आम्ही प्ले पॉलिसी रिक्रुटमेंटचे उल्लंघन केल्याबद्दल ३,५०० हून अधिक वैयक्तिक कर्ज ॲप्स काढून टाकण्यासह आवश्यक अंमलबजावणी कारवाईचे पुनरावलोकन केले आहे. कंपनी नियमितपणे धोरणांमध्ये सुधारणा करते, प्रक्रियांचे पुनरावलोकन करते आणि सतत दुरुस्तीचा प्रयत्न करत असते, अशी माहीती गुगलने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button