breaking-newsपुणेमहाराष्ट्र

PUBG क्रेझ : पुण्यातील जोडप्याने प्री-वेडिंगसाठी साकारली अनोखी थीम

PUBG हा मोबाईल गेम मागच्या काही काळापासून जोरदार गाजतो आहे. लहान मुलांपासून मध्यमवयीनांपर्यंत या गेमची क्रेझ असल्याचे चित्र आहे. हीच क्रेझ इतकी जास्त आहे की एका जोडप्याने चक्क प्री वेडिंगची थीम म्हणून या गेमचा सेट उभारला होता. या गेमचे व्यसन लागल्याने काही महाविद्यालये आणि ऑफीसमध्ये हा गेम खेळण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही या गेमचे वेड कमी झाले नाही. अशाच या गेमचे चाहते असलेल्या पुण्यातील एका जोडप्याने आपल्या प्री वेडिंग शूटसाठी PUBG या गेमची थीम करण्याचे ठरवले. त्या गेममधील संकल्पनेप्रमाणे सेट उभा करुन त्यांनी आपल्या लग्नाच्या आधीच्या आठवणी साठवून ठेवण्याचे ठरवले. त्यांनी हुबेहूब PUBG प्रमाणे सेट उभा करुन त्यात त्या गेममधील पात्रांप्रमाणेच वेशभूषाही केली आहे.

PlayerUnknown’s Battleground अर्थात PUBG हे सध्या करमणुकीचं नवीन साधन झालं आहे. मुख्य म्हणजे हा गेम खेळता खेळता अनेकजण त्यात इतके गुंग होतात की आजूबाजूला काय घडतंय याचा अंदाजही त्यांना येत नाही. ८० टक्क्य़ांहून अधिक अ‍ॅक्शन गेम्सप्रमाणे हा गेमही हिंसक असा म्हणजेच मारामारी आणि शस्त्रं घेऊन व्हर्च्युअल (आभासी) जगामध्ये वावरण्यासंदर्भातच आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि सतत होत राहणाऱ्या अ‍ॅक्शनमुळे तरुणाईला या गेमची भुरळ पडली आहे. वाळवंट, शहर आणि जंगल अशा तीन थीममध्ये एकटय़ाने किंवा दोघांची अथवा चौघांची टीम बनवून हा गेम खेळला जातो.

एका बॅटलफिल्टमध्ये १०० अनोळखी गेमर्स एका वेळेस हा गेम खेळतात. गेम खेळण्यासाठी दिलेली जागा हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे एकमेकांना ठार करून शेवटी जिवंत राहणारा या गेममध्ये जिंकतो. या गेममध्ये हॉकी स्टिक्स, एके ४७, मशीनगन्स, तलवारीच्या साहाय्याने समोरच्या गेमरला ठार मारले जाते. फेसबुक लॉगइनच्या मदतीने गेम खेळल्यास आपल्या फेसबुक मित्रांबरोबर टीम करून हा गेम खेळता येतो. मागील महिन्यातच या गेमचा सिझन ४ ही दाखल झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button