breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत किती वर्ल्डकप सामने खेळले गेले? हवामान अंदाज?

Ind vs Aus : आयसीसी वर्ल्डकप २०२३ च यजमानपद यावेळी भारताकडे आहे. ५ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपच्या मॅचेसला सुरुवात झाली आहे. वर्ल्डकपमधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत आज ८ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दुपारी २ वाजता खेळला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत किती वेळा सामना झाला आहे. आणि आतापर्यंत झालेल्या सामन्यांत कोणी किती वेळा बाजी मारली आहे. पाहुयात…

आतापर्यंतच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या वर्ल्डकप मॅचेसचा विचार केला तर हे दोन्ही देश १२ वेळेस आमने सामने आलेले आहेत. वल्डकपमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून देखील ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या संघाकडे पाहिले जाते. वर्ल्डकपच्या रेसमध्ये ऑस्ट्रेलिया निश्चितच भारताच्या पुढेच आहे. कारण भारताने वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत दोनच वर्ल्डकप जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत ५ वेळा वर्ल्डकपवर आपले नाव कोरलेले आहे. यावरून असं लक्षात येत की ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्डकपमध्ये भारतापेक्षा नक्कीच सरस आहे. आतापर्यंतच्या वर्ल्डकपच्या इतिहासात भारत-ऑस्ट्रेलिया १२ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजेच ८ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तर बाकीच्या ४ सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांकडून पंतप्रधान मोदींचा हिटलर असा उल्लेख; म्हणाले..

हवामानाचा अंदाज :

चेन्नईतील हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. सरासरी तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, तर आद्रता ७१ टक्क्यांपर्यंत राहील. वाऱ्याचा वेग सुमारे १४ किलोमीटर प्रति तास असेल. पावसाचा अंदाज हा ५० टक्के असणार आहे.

भारतीय संभाव्य संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ :

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, जोश इंग्लिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button