breaking-newsपुणेमहाराष्ट्र

संभाजी भिडेंना तडीपार करा, भीम आर्मीची मागणी

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 1 जानेवारी 2019 ला राज्यातील अनेक भागातील नागरिक लाखोंच्या संख्येने अभिवादन करण्यास येणार आहेत. गतवर्षीची घटना लक्षात घेता 25 डिसेंबर 2018 ते 5 जानेवारी 2019 पर्यंत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पाच जिल्ह्यातून तडीपार करावे आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही मागणी केली.

गतवर्षी भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी दरम्यान घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे, मनोहर एकबोटे यांच्यावर सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही असा आरोप दत्ता पोळ यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पुण्यात 30 डिसेंबर 2018 ला दुपारी तीन वाजता भीमा कोरेगाव संघर्ष महासभेला भीम आर्मी संघटनेचे सर्वेसर्वा चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा होणार असून या सभेला परवानगी देण्यावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र मागील वर्षभरात भिडेंना पोलीस आणि प्रशासन राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम किंवा सभा घेण्यास परवानगी देत आहे, असा दुजाभाव होता कामा नये. आम्ही कोणत्याही परिस्थितीत चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांची सभा घेणार असून त्या संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास न्यायालयात दाद देखील मागितली जाईल अशी भूमिका त्यांनी मांडली’.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button