ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजित पिंपरी चिंचवड प्रिमियर लीग व वुमेन्स प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात

तब्बल चार महिने चाललेल्या स्पर्धेत ३०० पेक्षा जास्त संघांचा सहभाग

पिंपरी : राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजित पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या अशा पिंपरी चिंचवड प्रिमियर लीग व पिंपरी चिंचवड वुमेन्स प्रिमियर लीग २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

तब्बल चार महिने चाललेल्या व ३०० पेक्षा जास्त संघांचा सहभाग असलेल्या पिंपरी चिंचवड प्रिमियर लीग या स्पर्धेचे सोसायटी पुरुष गटातील प्रथम पारितोषिक रॉयल DN ११ या संघाने ने पटकावले, द्वितीय पारितोषिक फ्लोरेंसिया स्ट्राईकर्स, तृतीय पारितोषिक पाल्म रोझ वॉरियर्स व चतुर्थ पारितोषिक सोनिगरा विहार फ्रेंड्स या संघाने पटकावले तसेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पिंपरी चिंचवड वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.

मागील वर्षापेक्षा या वेळी जास्त संघानी सहभाग घेतल्यामुळे चुरसीच्या झालेल्या या स्पर्धेत प्रथम पारितोषिक टीम गेम चेंजर या महिला डॉक्टर या संघाने पटकावले, द्वितीय पारितोषिक टीम वूड्सविले लेजंट्स, तृतीय पारितोषिक टीम पार्क स्ट्रीट चॅम्पियन, चतुर्थ पारितोषिक टीम द सुपर स्ट्राईकर्स या संघाने पटकावले.

यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, विजय कलाटे, समीर कलाटे, किरण वडगामा, सुधीरजी देशमुख, दत्तात्रय देशमुख, बाळकृष्ण कलाटे, मनोज कांबळे, डॉ. सपना डांगमाळी, व इतर मान्यवर तसेच स्पर्धेची आयोजक टीम अक्षय पाटील, शशांक सुर्वे, ऋषिकेश नेरपगार, मयूर चिंचोरे, ओम शेट्टी, राहुल ढोके, अजय तोडकर, सुरज भरगुडे पाटील, निलेश पंकज पाटील. नीलरंजनाताई, डॉ. अदितीताई थेऊरकर, पारुलताई जैन व स्पर्धेतील स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी विजयी संघांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button