पिंपरी / चिंचवडपुणे

उसन्या पैशांवरून चिंचवडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

नऊ जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

आर्थिक कारणावरून दळवीनगर झोपडपट्टी येथे शुक्रवारी (दि. 17) रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन्हीकडील एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

एका महिलेच्या फिर्यादीनुसार सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेने उसने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांच्याशी भांडण करून त्यांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सिमेंटच्या ब्लॉक, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. तसेच एका व्यक्तीने फिर्यादीसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी महिलेच्या दुचाकीची आरोपींनी तोडफोड केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने ज्यादा व्याजदराने पैसे दिले. ते व्याजासह परत देऊन देखील आरोपींनी परत पैशांची मागणी केली. त्यावरून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून हाताने, सिमेंट ब्लॉकने मारहाण केली. तसेच फिर्यादींसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. यात तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button