breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमधून जगतापांना 38 हजारांचे लीड, तर कलाटेंना 1 लाख 12 हजार 225 मते

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांना 1 लाख 50 हजार 723 एवढे मताधिक्य मिळाल्याने विजयाची शंभर टक्के खात्री मिळत आहे. अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांनी 1 लाख 12 हजार 225 मते घेतली आहेत. राहूल कलाटे 38 हजार 498 मतांनी पिछाडीवर आहेत.

निवडणुकपूर्व प्रचारामध्ये राहूल कलाटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना जोरदार टक्कर दिली होती. राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घेतल्यामुळे कलाटे चांगली टक्कर देऊ शकतील याचा अंदाजही होता. आमदार जगतापांनी सुध्दा जोरदार फिल्डींग लावलेली होती. त्यामुळे दोघांमध्ये अत्यंत घासून मतदान झाले. सुरूवातीच्या काही फे-यांमध्ये दोघांमध्ये अवघ्या काही हजार मतांचा फरक होता. त्यामुळे भाऊ समर्थकांची अडचण झाली होती.

आमदार जगतापांचा विजय निश्चित

सुरूवातीला केवळ दहा हजारांची आघाडी होती. ही आघाडी कायम असताना कलाटे समर्थकांना यात बदल होण्याची अपेक्षा लागली होती. मात्र, जगतापांनी शेवटपर्यंत बाजी मारल्यामुळे सायंकाळी कलाटे यांचा पराभव अधोरेखीत झाला. जगतापांनी 1 लाख 50 हजार 723 मताधिक्य मिळविले आहे. कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते मिळाली आहेत. जगतापांनी 38 हजार 498 मतांची आघाडी घेतली आहे. काही फे-या बाकी राहिल्या आहेत. परंतु, हे लीड तोडणे शक्य नसल्याने जगतापांचा विजय निश्चित मानला जात आहे. कार्यकर्त्यांनीही फटाके वाजवून गुलालाली उधळण केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button