breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

प्रभू श्रीरामालाही घराणेशाहीवादी म्हणायचे का? प्रियंका गांधींचा भाजपावर हल्लाबोल

देशाचे पंतप्रधान अहंकारी आहेत, अहंकारी राजाला जनता उत्तर देणार

दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रियंका गांधई यांच्या नेतृत्वात दिल्लीत राजघाटावर संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी बड्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तरीही तुम्ही त्यांना पप्पू म्हणून हिणवता. राहुल गांधी पप्पू नाहीये हे तुम्हालाही कळून चुकलं आहे. राहुल गांधींना जनता साथ देत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नामुले ते हादरून गेले आहेत, असं सांगतानाच आपल्या देशाचे पंतप्रधान घाबरट आहेत. ते अहंकारी आहेत. सत्तेच्या ढाली पाठी ते लपले आहेत. तुम्ही माझ्यावर केस दाखल करा, तुरूंगात पाठवा. पण सत्य बदलणार नाही. अहंकारी राजाला जनता उत्तर देणारच, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.

घराणेशाहीवरून भाजपकडून गांधी कुटुंबावर वारंवार हल्ला केला जात आहे. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही आम्हाला घराणेशाहीवरून हिणवता तर भगवान राम कोण होते? प्रभू रामाला वनवासात पाठवलं गेलं. तेव्हा त्यांनी आपलं कुटुंब आणि या धरणीमातेच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य निभावलं. मग प्रभू श्रीरामालाही घराणेशाहीवादी म्हणायचे का? आपल्या कुटुंबाच्या संस्कारासाठी लढणारे पांडवही घराणेशाहीचे समर्थक होते काय? आमच्या घरातील लोक या देशासाठी शहीद झाले याची आम्हाला लाज वाटली पाहिजे का?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

माझ्या वडिलांचं पार्थिव तिरंग्यात लपेटलेलं होतं. पार्थिवाच्या पाठी चालत चालत माझा भाऊ इथपर्यंत आला होता. माझ्या शहीद वडिलांचा अपमान संसदेत केला जातो. शहिदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही आणि मीर जाफर म्हणता. त्याच्या आईचा अपमान करता. तुमचे केंद्रातील मंत्रीही माझ्या आईचा संसदेत अपमान करतात. ते म्हणतात राहुल गांधी यांना त्यांचे वडील कोण आहेत हे माहीत नाही. पंतप्रधान म्हणतात ते नेहरू आडनाव का वापरत नाही. तरीही तुमच्यावर खटला भरला जात नाही. तुमची सदस्यता रद्द होत नाही, असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button