breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘2009 ला जर मला निवडणूक लढऊ दिली असती तर..’; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवायचा

परळी : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तुम्ही जर मला २०१९ ला निवडणून दिलं असतं तर वेगळं चित्र असतं तर वेगळं चिन्ह असतं असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

2009 ला जर मला निवडणूक लढऊ दिली असती तर आज परळी मतदारसंघ 15 वर्ष पुढे गेला असता. बारामती, इस्लामपूरपेक्षाही जास्त विकास मतदारसंघाचा झाला असता. दहा वर्ष तुम्ही सत्तेत होता मंत्री झालात मग या भागाचा विकास का केला नाही? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. ते जलजीवन मिशनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग तुम्ही सिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवायचा. वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रूपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शेरमेची बाब आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button