breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे देऊळवाड्यातून थेट प्रक्षेपण होणार

Ashadhi Wari : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे देऊळवाड्यातील थेट प्रक्षेपण रविवारी (ता. ११) केले जाणार असून, शहरातील विविध सहा ठिकाणांसह दर्शबारीत मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच, देऊळवाड्यातील भाविकांची सुरक्षा आणि संशयित घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ९५ सीसीटीव्ही कॅमेरे देऊळवाडा आणि परिसरात लावले आहेत.

आषाढी वारी सोहळ्यानिमित्त आळंदीत पालखी प्रस्थान येत्या रविवारी आहे. मंदिरातील गर्दीचे नियोजन, घातपात अथवा चोरीसारख्या घटनांवर नजर ठेवण्यासाठी देवस्थान व्यवस्थापनाने ९५ सीसीटीव्ही कॅमेरे विविध ठिकाणी लावले आहेत. मंदिराभोवतीही कॅमेरे लावले जाणार आहेत. प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंदिराबाहेरील भाविकांना केले जाणार आहे.

हेही वाचा – MPL: पिंपरी-चिंचवडचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणार!

तयारी दृष्टीक्षेपात

  • प्रस्थान सोहळ्याचे थेट देऊळवाड्यातून प्रक्षेपण करणार
  • आळंदी शहरात सहा ठिकाणी स्क्रीन
  • देऊळवाडा आणि परिसरात ९५ सीसीटीव्ही कॅमेरे
  • कर्मचारी, स्वयंसेवक २४ तास स्वच्छता करणार
  • महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button