breaking-newsराष्ट्रिय
#Coronolockdown:लॉकडाऊन वाढीचा आधार केंद्राने सांगावा : सोनिया गांधी
नवी दिल्ली. लॉकडाऊन किती दिवस राहायला हवे हे कोणत्या आधारे ठरवत आहेत, याबाबत केंद्र सरकारने सांगावे. तसेच १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपल्यानंतर काय होणार आहे, अशी विचारणा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधींनी केली आहे. बुधवारी पक्षाचे नेते आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. या बैठकीत डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पी. चिदंबरम यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.