breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना काळात बंद झालेली खासगी ‘तेजस’ पुन्हा सुरू

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने बंद ठेवलेली खासगी रेल्वे ‘तेजस’ आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-अहमदाबाद आणि लखनऊ-नवी दिल्ली अशी तेजस एक्स्प्रेस आजपासून आठवड्यातून ४ दिवस पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने दिली.

अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद ही ८२९०१/८२९०२ आणि ८२५०१/८२५०२ लखनऊ-नवी दिल्ली-लखनऊ ही तेजस आठवड्यातून ४ दिवस म्हणजे सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीने दिली आहे. या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांना वेबसाईटवर करता येईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे तेजस एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता ती पुन्हा सुरु झाली आहे. नवी दिल्ली ते लखनौ ही तेजस ऑक्टोंबर २०१९ पासून सुरू झाली होती तर मुंबई-अहमदाबाद या मार्गावर जानेवारी २०२० पासून तेजस ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधा असलेले ही ट्रेन आहे. त्यात प्रवाशांना २५ लाखांपर्यंत विमा संरक्षण आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button