breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये डेल्टाचे ३० रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

नाशिक – एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाशिक जिल्ह्याने आता पुन्हा जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. या जिल्ह्यात शुक्रवारी एका दिवसात डेल्टाची लागण झालेले ३० नवे रुग्ण सापडले. त्यातील २८ रुग्ण ग्रामीण भागातील असून २ गंगापूर आणि सादिक नगरचे आहेत. यामुळे नाशिकमधील कोरोनाचे निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील कोरोना रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यात ३० जणांना डेल्टा विषाणूच्या प्रकाराची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. हे रुग्ण सिन्नर, येवला, नांदगाव, निफाड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातील आहेत. ३० पैकी २८ रुग्ण ग्रामीण भागातील असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. मास्क आणि सामाजिक अंतराचा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. डेल्टाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, असे नाशिकचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर श्रीनिवास यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button