breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सामनाच्या रोखठोकमध्ये पंतप्रधान मोदांची स्टॅलिनशी तुलना

मुंबई : दैनिक सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान मोदांची तुलना स्टॅलिनसबोत केली आहे. स्टॅलन हट्टी, वर्चस्व गाजणाऱ्या वृत्तीचा होता, असं सामनातून म्हटलं आहे. स्टॅलिनने विरोधकांना संपवलं तर पोलीस आणि यंत्रणांचीही वापर केला आपल्या देशातही सध्या हेच सुरू आहे, असं सामनातून म्हटलं आहे.

सामनात नेमकं काय म्हटलं आहे?

स्टालिनचे एक चरित्र वाचनात आले. स्टालिन हा कमालीचा हट्टी, दुराग्रही आणि इतरांवर वर्चस्व गाजवण्याच्या वृत्तीचा होता. तो त्याच्या मनाप्रमाणे धर्माचे अवडंबर माजवी, पण धर्म आणि परमेश्वर यापैकी कुणावरही त्याचा विश्वास नव्हता. स्टालिनच्या कारकिर्दीत त्याची खोटी चरित्रे लिहिली गेली. इतिहासही खोटा लिहिला गेला. १९०५ च्या उठावात स्टालिनने शौर्य गाजवले अशा धादांत खोटय़ा कथा प्रसिद्ध झाल्या. स्टालिन हा साहसी, पराक्रमी होता याबाबत अनेक दंतकथा त्याच्या काळात रचल्या गेल्या व लोकांत पसरवल्या गेल्या. लेनिनची अनेक वचने स्टालिनने आपल्या सोयीप्रमाणे वापरली. लेनिनच्या दृष्टीने स्टालिन हा एक नंबरचा बेमुर्वतखोर, सत्तापिपासू होता व लेनिनने तसे लिहून ठेवले. स्टालिनच नव्हे तर कोणाही नेत्याच्या हाती अनिर्बंध सत्ता येऊन तो मदांध होऊ नये ही लेनिनची इच्छा होती.

हेही वाचा – Ruturaj Gaikwad Wedding : क्रिकेटर ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात

१९२३ साली एका डोंगराळ भागात झिनोव्हिव्ह बुखारीन, व्होरोशिलॉव्ह वगैरे नेते जमले व सामुदायिक नेतृत्व कसे आणावे यावर चर्चा सुरू केली, पण त्यांच्यात एकमत झाले नाही. बुखारीन त्यांच्यातून फुटला. पुढे बुखारीनला हाताशी पकडून स्टालिनने इतर नेत्यांचा काटा काढला. पुढे बुखारीनला काही काळ वापरून स्टालिनने त्याचाही काटा काढला. स्टालिनने विरोधकांना संपवले. त्यासाठी पोलीस व गुप्तचर यंत्रणांचा वापर केला. आज पुतिनही तेच करीत आहेत. आपल्या देशातही वेगळे काय घडते आहे! असं सामनात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button