ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात २४ तासात पावसाची हजेरी; सातार, बीडमध्ये मुसळधारा

मुंबई |मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली  आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

सोमवारपासूनच हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला होता. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. दरम्यान, या आठवड्यात महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल जाणून घेऊयात.

मुंबई
मुंबईत आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान ३३ आणि किमान तापमान २८ अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे.

पुणे
पुण्यात कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. इथंही आठवडाभर आकाश अंशतः ढगाळ राहील. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.

नागपूर
नागपुरात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. आठवडाभर अंशतः ढगाळ हवामान असू शकतं. यामुळे मंगळवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान ४२ तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

नाशिक
नाशिकमध्ये आठवडाभर अंशतः ढगाळ आकाश दिसू शकते. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान ३४ आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील.

औरंगाबाद
औरंगाबादमध्ये या आठवड्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. शुक्रवार आणि शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button