Uncategorized

पत्नी व मुलीला विष देऊन पती फरार; घटनेत सहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

ठाणेः काशीमीरा येथील हॉटेलमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. तर, मुलीची आई बेशुद्धावस्थेत सापडली असून मुलीचे वडील फरार आहेत. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली असून पोलिस बेपत्ता वडिलांचा शोध घेत आहे.

वसईतील एव्हरशाईन सिटीत हे कुटुंब राहत असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यातच करोना महामारीत दोघांनीही नोकरी गमावली. त्यामुळं कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांचे राहते घर विकावे लागले. त्यामुळं या कुटुंबाने आत्महत्येचा मार्ग निवडला. मात्र, या घटनेत मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, आई गंभीर जखमी असून रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. वडिल बेपत्ता असल्याने संशयाची सुई त्यांच्यावर आहे.
अनायका असं घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर, पुनम ब्रॅको असं आईचं नाव आहे. रविवारी रात्री पुनमने जेवणातून विष खाऊ घातलं. त्यानंतर तिने स्वतः विष घेऊन तिच्या पतीकडे विषाची बाटली दिली. तसंच, तिने रयानला विष खातानादेखील पाहिल होतं. मात्र, विषाचा परिणाम हळूहळू होत होता. त्यानंतर रयानने तिला गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली.

पुनम शुद्धीत आल्यानंतर मुलगी अनायकाला बेशुद्धावस्थेत पाहिलं तसंच, तिच्या तोंडातून फेसदेखील येत होता. मात्र, तिचा पती गायब होता. त्यानंतर तिने मदतीसाठी आरडा-ओरडा केल्यानंतर हॉटेल स्टाफने डुप्लिकेट चावीने खोली उघडली. तेव्हा त्यांना मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं व घडलेल्या घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button