breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक – राजनाथ सिंह

नवी दिल्ली |

धर्माच्या आधारावर भारताची फाळणी करणं, ही ऐतिहासिक चूक होती, असे वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. सशस्त्र दलांच्या योगदानाचे स्मरण करणार्‍या ‘स्वर्णिम विजय पर्व’च्या उद्घाटनावेळी रक्षा मंत्री सिंह यांनी हे वक्तव्य केलं. नवी दिल्लीतील इंडिया गेट लॉन्स येथे रविवारी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “१९७१चं युद्ध आपल्याला हेच सांगते की धर्माच्या आधारावर भारताची फाळणी ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला पण तो एकच राहू शकला नाही.”

“१९७१ च्या युद्धातील पराभवानंतर, पाकिस्तान सतत छुपं युद्ध लढत आहे. पाकिस्तानला दहशतवाद आणि इतर भारतविरोधी कारवायांना प्रोत्साहन देऊन भारतातील शांतता बिघडवायची आहे. भारतीय सैन्याने १९७१ मध्ये त्यांच्या भारताविरोधातील कारवाया हाणून पाडल्या होत्या आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी काम केले होते. तेव्हापासून अजूनही भारत पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी काम करत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या अप्रत्यक्ष युद्धातही विजय आमचाच असेल,” असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

१९७१ च्या युद्धाचे स्मरण करून राजनाथ सिंह म्हणाले, “आमच्या सशस्त्र दलांनी ‘मुक्तिवाहिनी’ला पाठिंबा दिला, लाखो निर्वासितांना मदत केली. तसेच पश्चिम आणि उत्तरेकडील सर्व प्रकारचे आक्रमण रोखले. त्यांनी शांतता, न्याय आणि मानवतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची विश्वासार्हता सुनिश्चित केली. इतिहासात हे क्वचितच पाहायला मिळंत की एखाद्या देशाला युद्धात पराभूत केल्यानंतर, दुसरा देश आपले वर्चस्व लादत नाही, तर आपल्या राजकीय प्रतिनिधीकडे सत्ता सोपवतो. भारताने हे केले कारण तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे,” असंही सिंह यावेळी बोलताना म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button