breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली | महाईन्यूज

भारतीय अवकाश संशोधन संस्थे(इस्रो)नं 17 जानेवारी शुक्रवारी पहाटे 2.35 मिनिटांनी GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. फ्रान्समधील फ्रेंच गुएनास्थित कोरो द्वीपसमूहातून याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. उपग्रहाचं प्रक्षेपण झाल्यानंतर काही काळानंतर GSAT-30हून एरियन -5 VA251चा वरचा भाग यशस्वीरीत्या वेगळा झाला. इस्रोचं हे 2020मधलं पहिलं मिशन आहे. हा उपग्रह प्रक्षेपणानंतर 15 वर्षं काम करत राहणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये स्थापित करण्यात आलं असून, यात दोन सोलर पॅनल आणि बॅटरी असल्यानं त्यातून ऊर्जा उत्पन्न होणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार GSAT-30 हा एक संचार उपग्रह आहे. तो इनसॅट-4ए सेटलाइटच्या जागेवर काम करणार आहेत. इनसॅट सॅटेलाइट-4चं वय आता पूर्ण होत आलं आहे. त्यातच इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. त्यामुळे जास्त शक्तिशाली उपग्रहाची गरज आहे. त्यासाठी इस्रोनं GSAT-30चं प्रक्षेपण केलेलं आहे.

GSAT-30 उपग्रह हा इनसॅट-4एची जागा घेणार आहेत. इनसॅट-4एला वर्ष 2005मध्ये लाँच करण्यात आलेलं होतं. या उपग्रहामुळे भारताची दूरसंचार सेवा आणखी प्रभावी होणार असून, इंटरनेट स्पीडही वाढणार आहे. तसेच ज्या क्षेत्रात मोबाइल सेवा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, तिकडेही पोहोचणं या उपग्रहामुळे शक्य होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button