breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

‘..तर १२.८८ लाख उद्योजकांनी भारत का सोडला?’ प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मल सीतारामण यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, हे सरकार केवळ ज्ञान पाजळतंय, परंतु, त्यांची या देशातल्या तरुणांशी, गरिबांशी, महिला आणि शेतकऱ्यांशी बांधिलकी दिसत नाही. अर्थमंत्री केवळ स्वतःची बढाई मारण्यात, थापा मारण्यात, भाषणबाजी करण्यात आणि खोटं बोलण्यात गुंतल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आपली अर्थव्यवस्थ उत्तम असेल तर गेल्या नऊ वर्षांमध्ये तब्बल १२,८८,२९३ उद्योजकांनी भारत का सोडला? ७,२५,००० भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला? यापैकी बहुसंख लोक हे ‘व्हायब्रंट गुजरात’शी संबंधित होते.

हेही वाचा   –    Police Bharti 2024 | राज्यात तब्बल १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती होणार 

केंद्राने दावा केला आहे की, लोकांचं सरासरी उत्पन्न ५० टक्क्यांनी वाढलं आहे. परंतु, या डेटाचा स्त्रोत काय आहे? सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या आणि पीएम-किसान योजनेबाबतचा डेटा संशयास्पद आहे. केंद्राने अंतरिम अर्थसंकल्पात केवळ ज्ञान पाजळण्याचं काम केलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button