breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Police Bharti 2024 | राज्यात तब्बल १७ हजार ४७१ पदांची पोलीस भरती होणार

Police Bharti 2024 | पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी गूड न्यूज आहे. राज्यात आता १०० टक्के पोलिस भरती होणार आहे. १०० टक्के पोलीस भरती करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. यामुळे पोलिस भरतीचा माग्र मोकळा झाला आहे. राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची भरती होणार आहे.

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त ५० टक्के पदांची भरती करता येते. पण पोलीस खात्यात १०० टक्के पदभरतीला मान्यता देण्यात आली आहे. पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशी एकूण १७,४७१ पदांची भरती केली जाणार आहे.

हेही वाचा    –    ‘अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले..’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रीया 

पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट, गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button