breaking-newsमनोरंजन

सुशांतच्या आचाऱ्याची सीबीआय करतेय चौकशी

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वेच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविल्यानंतर सीबीआयने सुशांतच्या आचाऱ्यालाच चौकशीसाठी आज सकाळी सांताक्रुझ येथील सरकारी गेस्टहाऊसवर पाचारण केले. तर दुसऱ्या अधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या दुसऱ्या एका टीमने वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन अपघाती मृत्यूबद्दलच्या एडीआरची स्टेशन डायरी, फोरेन्सिक रिपोर्ट शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सीबीआयची टीम या केसशी संबंधित लोकांचे जबाब नोंदविण्याचे काम करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे डीआरडीओ आणि एअरफोर्सचे सांताक्रुझ येथील गेस्टहाऊसमध्ये सीबीआयची टीम उतरली आहे, तेथे शुक्रवारी सुशांतच्या आचाऱ्याला बोलावण्यात आले होते. एका गाडीमध्ये सुशांतचा आचारी सीबीआयच्या अधिकाऱ्यासमोर बसल्याचे दिसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सीबीआयच्या टीमने मुंबई पोलिसांच्या चौकशी पथकाचे प्रमुख पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांचीही भेट घेतली. पथकाने राजपूतच्या घरी जाऊन घटनास्थळी आत्महत्येचा ‘क्राईम सीन’ रिक्रीएट केल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button