breaking-newsTOP NewsUncategorized

खंडाळा घाटात दरड कोसळली, पुणे-मुंबई रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत

लोणावळा: पुणे मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.

दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button