breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘निवडणुकीपूर्वी हिंदू मंदिरावर हल्ला होऊ शकतो’, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुका होईपर्यंत देशातील ५ मोठ्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजी किंवा सशस्त्र दलांना द्यावी, कारण निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी देशात अशांतता निर्माण केली जाऊ शकते आणि त्यासाठी मंदिरांचा वापर केला जाऊ शकतो, असा दावा आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभेचं विशेष अधिवेशन ज्यावेळेस जाहीर झालं, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही भूमिका मांडलीय की हे फोटोसेशन आहे. जो काही अजेंडा काल बाहेर आलाय, त्यावरून असं दिसतंय की, कुठेही सिरीयस विधेयक नाही. राज्यसभेनं मंजूर केलेलं बिल लोकसभेमध्ये मंजूर करायचं, हा एवढाच फक्त अजेंडा आहे. त्यामुळे २००० च्या नोटबंदीचा दुसऱ्यांदा निर्णय झाला, तर निवडणुका नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीय. या दोन्ही भूमिका आपल्याला २५ तारखेपर्यंत स्पष्टपणे समजतील.

हेही वाचा – IND vs BAN : बांग्लादेशविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल!

गेल्या नऊ वर्षांमधलं राजकारण बघता एखाद्या समाजावर अत्याचार करायचा. त्याच्यातून दहशत निर्माण होईल अला प्रयत्न करायचा, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या नावाचा वाद काढण्याच्या प्रयत्न या ठिकाणी झाला. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं तो वाद त्या ठिकाणी थांबलाय. आता मराठी विरूद्ध ओबीसी असा वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. म्हणजे देशांमध्ये अशांतता कशी राहील, याचा प्रयत्न सुरू असतो. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. अशा या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या माहितीवरून हिंदू धर्मीयांच्या जिव्हाळ्याच्या मंदिरांवर हल्ला केला जाणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाराणसीचं ज्ञानवापी, अयोध्या रामजन्मभूमी मंदिर, मथुरेचे मंदिर, जम्मु कटरा येथील वैष्णोदेवी मंदिर, दिल्लीमधील स्वामीनारायण, अक्षरधाम मंदिर हे कदाचित टार्गेट होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या आरएसएसची धार्मिक पोलरायझेशन करायची वृत्ती आहे. कदाचित तिला वाव मिळू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करतेय. निवडणुका होईपर्यंत ही सगळी मंदिरं सैन्याच्या ताब्यामध्ये देण्यात यावीत. निवडणुकीनंतर मग त्या-त्या पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये ती जातील. इलेक्शन हे धार्मिक स्वरूपाचं होऊ नये हाच आमचा हेतू आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button