TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

पिंपरीमध्ये पाकिस्तानी दहशतवद्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आम आदमी पक्षाचे निषेध आंदोलन

पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद, वीर जवान अमर रहे! दिल्या घोषणा

पिंपरीः पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा पुतळ्याला चपला-बुटाने मारून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आम आदमी पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान नेहमीच दहशतवद्यांमार्फत भ्याड हल्ले करून भारतातील शांतता भंग करत आहे, काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये चार भारतीय जवानांना आपला जीव गमावावा लागला, या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपचे कार्यकर्ते पिंपरी येथे एकवटले होते. यावळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद, वीर जवान अमर रहे! अशा घोषणा दिल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या विरमरण झालेल्या चार जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या निषेध आंदोलनाला आपचे चेतन बेंद्रे, राशीद अत्तार, हुसेन शेख, इम्रान खान, स्मिता पवार, अरुणा सिलम, कल्याणी राऊत, सरोज कदम, सीमा बावनकर, सुरेश भिसे, प्रशांत कोलावटे, सतीश नायर, दत्तात्रय काळजे, संतोष इंगळे, सय्यद शेख चाचा, रोहित सरनवबत, गोकुळ नवले, अभिजित सूर्यवंशी, सचिन पवार, स्वप्निल जेवळे, भारत विठ्ठल दास आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button