breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहिला दिन

Positive news: डी.एस.के. कुंजबन सोसायटीत पाणीविरहित होळी! 

पाणी बचतीचा दिला संदेश : रंगोत्सवामध्ये रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी : शहरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर होळी व धुलीवंदन हे उत्सव पाण्याचा अपव्यय टाळून साजरे करण्याची गरज आहे. रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगोत्सव साजरा केल्यास पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही आता सवय झाली पाहिजे, पाणीबचतीसह पर्यावरणाच्या रक्षणास हातभार लागेल, असा संदेश डी.एस.के. कुंजबन सोसायटीच्या रहिवाशांनी दिला.

काटे वस्ती, पुनावळे येथील डी.एस. के. कुंजबन सोसायटी कार्यकारी समिती व सांस्कृतिक समितीच्या पुढाकाराने होळी व धुलीवंदन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी पाणी बचतीचा संदेश देत होळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

सोसायटीच्या क्लब हाउस येथे सर्व सदस्यांनी पाणी विरहित एकमेकांना नैसर्गिक रंगांची उधळण केली. पाणी वाचवा, केमिकल विरहित रंग लावत, प्रेम स्नेह व आपली संस्कृती जपत धुलीवंदन धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. धुलिवंदनची गाणी लावून त्यावर महिला, पुरुष, लहान मुले यांनी ठेका धरीत नृत्य केले. रंगोत्सवानिमित्त सांस्कृतिक समितीने आकर्षक सजावट केली होती. 

डी.एस.के. कुंजबन सोसायटीमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील रहिवाशी आहेत. या सोसायटीमध्ये सर्व सण-उत्सव एकोप्याने उत्साहात साजरे केले जातात. भारतीय संस्कृती संवर्धनासाठी कार्यकारी समिती व सांस्कृतिक समिती आग्रही असते.  

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा उपलब्ध साठा याचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी उन्हाळा सुरू झाला असतानाच पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. पाणी बचत ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय न करता पाणीमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन रहिवाशांना करण्यात आले. पाणी बचतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– उत्तम नलावडे, सचिव, डी.एस.के. कुंजबन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button