breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह ५० लोकांना आमंत्रण…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सहा मंत्री शपथ घेणार आहेत. मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, इम्रान हुसेन, गोपाल राय, राजेंद्र गौतम आणि कैलाश गहलोत हे सहा नेते केजरीवालांसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी आपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. अरविंद केजरीवालांनी शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. तसंच, हा शपथविधी सोहळा विशेष असणार आहे कारण केजरीवालांनी या सोहळ्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह ५० लोकांना आमंत्रित केले आहे. 

दिल्लीला पुढे नेण्यासाठी प्रमुख भूमिका असलेल्या सफाई कामगार, मेट्रो चालक, शेतकरी यासह ५० जणांना आपकडून खास निमंत्रण देण्यात आले आहे. हे सर्वजण केजरीवालांसोबत मंचावर उपस्थित राहणार आहेत. केजरीवाल यांच्यासमवेत एकूण ७० जण मंचावर असतील. या शपथविधी सोहळ्यामध्ये एकूण एक लाख लोकं सहभागी होतील, असा दावा आपने केला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button