Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

Waqf Amendment Bill Passed | वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत कसोटी

Waqf Bill Amendment | केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. त्यांनंतर काल दुपारी १२ वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत.

या विधेयकाच्या चर्चे दरम्यान सत्ता पक्षांच्या खासदारांनी विधेयकाचे समर्थन केले तर विरोधी पक्षांच्या खासदारांन याला कडाडून विरोध केला. यावेळी सभागृहात चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकावरील चर्चेत सहभगी होत असताना संसदेच्या सभागृहातच हे विधेयक फाडून टाकल्या ज्यावर सत्ताधारी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला.

हेही वाचा  :  Supreme Court | घरं पाडली त्यांना १० लाख भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयाचा युपी सरकारला दणका

विधेयकातील काही महत्त्वाच्या तरतुदी

१) वक्फ परिषदेमध्ये चार मुस्लिमेतर सदस्य असू शकतील. त्यामध्ये दोन महिला अनिवार्य असतील.

२) ‘मुतावालीस’ म्हणजे व्यवस्थापकांकडून संपत्तीचे योग्य व्यवस्थापन केले जात आहे की नाही यावर वक्फ मंडळे देखरेख करतील.

३) वक्फच्या संपत्तीचे थेट व्यवस्थापन करण्याचा अधिकार मंडळांना नसेल.

४) वक्फ मंडळे सर्वसमावेशी असतील. सुन्नीच नव्हे तर इतर मुस्लीम पंथांचे सदस्यही त्यात असतील.

५) मशीद अथवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनामध्ये वक्फ मंडळाच्या तरतुदींचा हस्तक्षेप नसेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button