Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गाव पुढाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; केंद्र सरकारकडून पाणंद रस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय…

मुंबई : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाणार आहे.

हेही वाचा –  ‘शिवसेना राष्ट्रवादी एकत्र, भाजपच्या भूमिकेबद्दल अनभिज्ञ’; शंभूराज देसाई

या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची रखडलेली कामे पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि. सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button