Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“….तर २४ लाख बेरोजगारांना रोजगार देऊ!” पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आश्वासन…

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण उद्योजक योजना तयार केली असून २४ लाख तरुणांना उद्योजक बनविण्याची योजना तयार केली आहे. मुख्यमंत्री जर पाठिशी राहिले आणि त्यांनी सहकार्य केले तर त्यांच्या नावाने ही याेजना सुरू केली जाईल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी येथे राष्ट्रीय पशु पदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पशुसंवर्धन विभागास कृषीला मिळणाऱ्या सर्व सवलती मिळतील, अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांना केली. राज्यातील उत्पन्नामध्ये २.८ वाटा पशुसवर्धन विभागाचा आहे. दूध उत्पन्नात राज्याचा पाचवा क्रमांक आहे. अंडी उत्पदनामुध्ये सातवा क्रमांक आहे तर मांस उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहोत.

हेही वाचा –  गाव पुढाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; केंद्र सरकारकडून पाणंद रस्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय…

बचत गटाच्या महिलाही आता मोठ्या प्रमाणात व्यावसाय करु लागल्या आहेत. सुमनताई सुकळीकर योजना सुरू केल्यापासून शुन्य टक्के व्याज दराने कर्ज मिळत असल्याने अनेक बचत गटाच्या ताई आता लखपती दीदी होत आहेत.

पशुसंवर्धन खात्यामध्येही मुख्यमंत्र्याचे नाव कोरले जावे असे काम खात्याकडून करुन दाखवू असे पंकजा मुंडे म्हणाल्या. येणाऱ्या अर्थसंकल्प पशुपालकांच्या मनात मुख्यमंत्री नाव कोरतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button