Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मराठा सर्वेक्षणासाठी विद्यार्थ्यांचा वापर, शिक्षकांनी लावले कामाला

Maratha Sarvekshan | मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्यात सर्वेक्षणाचं काम जोरात सुरू आहे. शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आलं आहे. मात्र, मराठा सर्वेक्षणासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थांना कामाला लावल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उपयोग केला जात असल्याने शिक्षण सोडून विद्यार्थी वर्गाबाहेर सर्वेक्षण करीत फिरत असल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे सर्वेक्षणाची माहिती व्यवस्थित संकलित होत आहे ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा    –    वीज बिल कमी करायचंय? तर या योजनेअंतर्गत घरावर बसवा सोलर पॅनेल 

लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील हा प्रकार आहे. एकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ तयार करीत हा प्रकार उघडकीस आणला. हा प्रकार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी चौकशी आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button