Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?

IND vs ENG 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिका गमावली असली तरीही वनडे मालिकेची सुरुवात गोड केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याची वेळ तर बदलली आहे पण संघाचा कर्णधारही बदलला जाईल. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याची वेळ बदलली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू झाला, जो इंग्लंडमध्ये दिवसाचा सामना होता. दुसरा एकदिवसीय सामना इंग्लंडमध्ये सामना दुपारी 12 वाजता सुरू होईल, तर भारतात पहिला चेंडू सायंकाळी 5:30 वाजता टाकला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना कार्डिफ येथे खेळला जाईल आणि टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा –  पावसाळ्यात या भाज्या खात असाल तर व्हा सावध…, उद्भवू शकतात पोटाच्या गंभीर समस्या

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि जर सामना पूर्ण 50 षटकांपर्यंत खेळला गेला, तर तो रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संपण्याची शक्यता आहे. सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल, तर जिओस्टार ॲपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. त्यामुळे, हा सामना सोनी टीव्हीवर आणि जिओस्टारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

आता दुसऱ्या सामन्याचे वेळापत्रक जसे बदलले आहे तसे आता कर्णधारही बदलला जाईल. कालच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामन्यात खेळी थांबवून मैदान सोडावे लागले. गिल 80 धावांवर रिटायर्ड बाद झाला. त्यामुळे पुढील सामना लगेचच उद्या असल्यामुळे गिल खेळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. जर गिल कर्णधार म्हणून मैदानावर उतरला नाही तर श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्त्व सांभाळताना दिसेल. यासोबतच गुरनुर ब्रारही दुखापतग्रस्त आहे. या दोन्ही खेळाडूंबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button