breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

वीज बिल कमी करायचंय? तर या योजनेअंतर्गत घरावर बसवा सोलर पॅनेल

Solar Rooftop Yojana 2023 | भारत सरकारने सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सौर रूफटॉप योजना. या योजनेंतर्गत सरकार घरगुती ग्राहकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान देते. अनुदानाची रक्कम सौर पॅनेलच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत असू शकते.

सौरऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही घरातील वीज खर्च वाचवू शकता. तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल लावल्यास तुमचं मासिक वीज बिल ३००० रुपयांवरून २४० रुपयांपर्यंत कमी होईल. यासाठी तुम्हाला ३kw चा रुफटॉप सोलर सिस्टम बसवावा लागेल. या सौर यंत्रणेचं आयुष्य २५ वर्षे आहे. या योजनेसाठी एकूण १.२६ लाख रुपये खर्च येतो. मात्र सरकारकडून काही स्वरूपात अनुदान देखील मिळते.

हेही वाचा    –    ‘अजितदादा, साहेबांना सोडून..’; रोहित पवारांचं अजित पवारांना पत्र

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्वप्रथम solarrooftop.gov.in या वेबसाइटवर जा. ‘Apply for Solar Rooftop’ वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाका. तुमची वैयक्तिक माहिती भरा. तुमच्या घराची माहिती भरा. अनुदानाची रक्कम निवडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सादर करा. यानंतर, सरकारकडून कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर एका विशिष्ट प्रक्रियेनंतर तुम्हाला सोलर रूफटॉप योजनेचा लाभ मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button