माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम
माजी नगरसेवक विक्रांत लांडे, विराज लांडे यांचा पुढाकार
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रक्तदान शिबीर, गरजु व्यक्तींना वस्तू वाटप, पांजरपोळ येथे अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला.
माजी नगरसेवक व लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे आणि पुतणे उद्योजक विराज लांडे यांनी याकामी पुढाकार घेतला. भोसरी विधानसभा मतदार संघात माजी आमदार लांडे यांची मोठी ताकद आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांडे शक्तीपदर्शन करतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र, लांडे बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड दौरा झाला. या दौऱ्यात विलास लांडे अनुपस्थित दिसले.
तळवडे- रुपीनगर प्रभागात २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ४ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी पंकज भालेकर यांनी पुढाकार घेत लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला. इंद्रायणीनगर प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांनीही उपक्रम घेतला असल्याचे सांगण्यात आले.
*
प्रा. कविता आल्हाट यांचा ‘उत्सव दिवस’…
महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवस उत्सव दिवस म्हणून साजरा केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रितपणे ‘खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निमित्ताने मोशीत वातावरण निर्मिती करण्यात आली.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि शहर राष्ट्रवादीला विसर?
माजी आमदार विलास लांडे शहराच्या राजकारणातील ‘शरद पवार’ म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तीप्रदर्शन करुन भाजपासमोर आव्हान निर्माण करण्याची संधी शहर राष्ट्रवादीला होती. मात्र, ज्यांच्या बोटाला धरुन शहराध्यख अजित गव्हाणे राजकारणात आले. त्यांना विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित् एकही विधायक कार्यक्रम घेता आला नाही, याचे आर्श्चय वाटते. लांडे बाहेरगावी आहेत, अशी पुष्टी देत गव्हाणे यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देवून वाढदिवसाचे सोपस्कार केले. वास्तविक, गव्हाणे यांनी पक्षाच्या मेळाव्याला स्वखर्चातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी याचे बॅनर लावले, अशी चर्चा लांडे समर्थकांमध्ये सुरू आहे.





