Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती’; उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल!

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मिंधे गटाने महाराष्ट्राची विल्हेवाट लावली आहे. आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी अशी झाली आहे. एका सर्वेनुसार आपलं राज्य अधोगतीकडे जात आहे. कारण महाराष्ट्र लुटला जातो आहे. मराठी अस्मिता पायदळी तुडवली जाते आहे. हे राज्य दरोडेखोर आणि गुंडांच्या हाती आहे, असं ठाकरे म्हणाले. ते जळगावच्या चोपडा येथे सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की गद्दारी फक्त शिवसेनेशीच नाही झाली, तर ती जनतेशीदेखील झाली आहे. आज अनेक जण आपल्याला पाठिंबा देत आहेत, हे बघून मिंधेंचीही बोबडी वळली असेल. मुळात नालायकपणा किती करावा याला मर्यादा असतात. एक संघटना महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली. जर ही स्थापन केली नसती केली, तर मुंबईत मराठी माणूस दिसला नसता, मिंधे गट कुठं आहे, हेसुद्धा कुणाला कळलं नसतं. या लोकांनी महाराष्ट्राची विल्हेवाट लावली आहे. आज महाराष्ट्राची ओळख गद्दारी अशी झाली आहे. एका सर्वेनुसार आपलं राज्य अधोगतीकडे जात आहे. कारण महाराष्ट्र लुटला जातो आहे. मराठी अस्मिता पायदळी तुडवली जाते आहे. हे राज्य दरोडेखोर आणि गुंडांच्या हाती आहे.

हेही वाचा      –        आमदार आण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी अभिनेता भाऊ कदम!

मिंधे गट आज राज्यभर फिरत आहेत, ही हे सगळे चोर आहेत. त्यांनी आपली शिवसेना चोरली, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, आणि आज मोठा आव आणून सांगतात की ही शिवसेना आमची आहे. यासंदर्भात आपण न्यायालयात गेलो होते. आज अडीच वर्ष झाली. न्यायालयाचे दार ठोकून ठोकून आता फक्त डोक आपटायचं बाकी राहिलं आहे. डी.वाय. चंद्रचूड हे तिसरे सरन्यायाधीश निवृत्त झाले. ते उत्तम प्रवचनकार होऊ शकतात. त्यांनी प्रवचन चांगले दिलं. पण डोळ्यादेखत लोकशाहीचा मुदडा पडला हे दिसत असताना, ते लोकशाही वाचू शकले नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button