Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन पिंपरी विधानसभा: आमदार आण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी अभिनेता भाऊ कदम!

महायुतीची वज्रमूठ : दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर प्रचार दौरा

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ मराठी अभिनेते भाऊ कदम मंगळवारी सकाळी दहा वाजता पिंपरी मधील मतदारांशी संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आता रंगात आली आहे. शेवटचा एक आठवडा या निवडणुकीसाठी शिल्लक आहे. येथे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रचंड कसरत करत आहेत. पिंपरी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी भाऊ कदम मतदारसंघात मतदारांशी संवाद साधणार आहे

दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर या भागात हा प्रचार दौरा होणार आहे. अण्णा बनसोडे याबाबत म्हणाले समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम केले आहे. मतदार संघातील तसेच शहरातील विविध समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात नागरिकांना वैद्यकीय, शैक्षणिक व आवश्यक ती मदत केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button