breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : माजी नगरसेवकांच्या ‘‘In-Out’’ मुळे महायुती ‘खतरे में’ चा FAKE NARRATIVE ! 

पिंपरी-चिंचवडमधील राजकीय विश्लेषकांमुळे महाविकास आघाडीला ‘हवा’ : ‘परप्रकाशित’ माननियांच्या बंडाचा परिणाम विधानसभेत जाणवेल काय? 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशामुळे राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मविआतील घटक पक्षांमध्ये संधी मिळवण्यासाठी इच्छुकांची चढाओढ लागली आहे. दुसरीकडे, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली जागा फिक्स करण्यासाठी माजी नगरसेवकांचीही रांग महाविकास आघाडीच्या दिशेने सुरू आहे. असे वावटळ उठवले जाते.  त्यामुळे महायुती किंबहुना भाजपाच्या चिंचवड आणि भोसरीतील विद्यमान आमदारांसह पिंपरीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना मोठा फटका बसणार… मोठा भूकंप वगैरे होणार… असे विश्लेषण राजकीय जाणकारांकडून केले जाते. 

वास्तविक, २०२२ पूर्वीच म्हणजे राज्यात महाविकास आघाडीची सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठा भूकंप होणार… अशी शक्यता शहरातील राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात होती. कधी हा आकडा- २५ तर कधी ३० पेक्षाही जास्तीचा सांगितला जात होता. २०१७ मध्ये ७७ नगरसेवक निवडून आणलेली भाजपा अध्यापेक्षा जास्त रिकामी होणार असा दावा केला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत असा भूकंप वगैरे काहीही झालेला नाही. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या माजी नगरसेवकांची मोठी अडचण झाली. ज्या भाजपाविरोधात लढतो. त्यांच्यासोबत सत्तेत रहायचे आणि पुन्हा महानगरपालिका निवडणुकीत विरोधात तिकीटापासून निवडून येण्यापर्यंत संघर्ष करायचा. त्यापेक्षा ‘तुतारी’ किंवा ‘मशाल’ हाती घेतलेली बरी… या भावनेतून अनेक माजी नगरसेवक राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्षांसह अनेकांनी ‘तुतारी’ वाजली. वास्तविक, ही मंडळी २०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्येही भाजपाच्या विरोधात होती आणि आहे. 

दुसरीकडे, आता विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा आहे. शहरातील चिंचवड आणि भोसरीत विद्यमान आमदार भाजपाचे आहेत. पिंपरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. मग, जिथे ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला तिकीट या सूत्रानुसार चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला संधी नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षी माजी नगरसेवकांनी ‘बंड’ पुकारले असून, लवकरच शरद पवार गट किंवा ठाकरे गटात प्रवेश निश्चित आहे, अशी राजकीय वस्तुस्थिती असताना माजी नगरसेवकांच्या बंडाचा परिणाम भाजपाच्या चिंचवड आणि भोसरी या दोन्ही जागांवर होईल किंबहुना दोन्ही जागा धोक्यात येईल, असा दावा राजकीय विश्लेषक करतात. पण, या विषयाची दुसरी बाजुसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. 

मावळ लोकसभा निवडणुकीचा निकाल काय सांगतो..? 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे आवलोकन केले असता, मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य आहे. चिंचवडमधून बारणेंना ७४ हजार ७६५ मतांची आघाडी आहे. तर पिंपरीतून १६ हजार ७३१ मतांची आघाडी आहे. या दोन्ही मतदार संघामध्ये दोन ते तीन नगरसेवकच शिंदे गटासोबत होते.  भाजपामधील शंकर जगताप यांच्यावर नाराज असलेली मंडळी सर्वाधिक आहे. पण, त्याचा परिणाम बारणे यांच्या मताधिक्यावर झालेला नाही. याउलट, राष्ट्रवादीतील मोठा गटाने महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांचे काम केल्याचे सांगितले जाते. तरीही बारणे यांनी बाजी मारली. कारण, ‘‘शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत…’’ हा पॅटर्न चालला. 

शिरुर लोकसभा निवडणुकीचा निकाल काय सांगतो? 

शहरातील भोसरी मतदार संघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघातून निवडून आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना भोसरीतून सुमारे १० हजार मतांची पिछाडी आहे. राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी महायुतीविरोधात कामे केले. त्याच नगरसेवकांनी पुन्हा ‘तुतारी’ हातात घेतली. भाजपातील १० ते १५ नगरसेवक आमदार महेश लांडगे यांच्यावर नाराज आहेत. मात्र, तरीही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे, शिरुर लोकसभेतील सहापैकी ५ विधानसभा मतदार संघामध्ये डॉ. कोल्हे आघाडीवर आहेत. पण, भोसरीमध्ये कोल्हे यांना कमी मतदान झाले. याउलट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक नगरसेवक मोठ्या संख्येने असताना, आमदार सोबतीला असतानाही डॉ. कोल्हे विजयी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button