breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

संभाजीराजे छत्रपतींच्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता, ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ पक्षाचं चिन्ह

पुणे | संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे. तर निवडणूक लढवण्यासाठी सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले आहे.

९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल, असं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं. याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे चिन्ह मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा    –      ‘लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद झाला’; देवेंद्र फडणवीस 

मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवली आहे. आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्हदेखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, असे संभाजीराजे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button