breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : गंगोत्री पार्क- दिघी रोडच्या मुद्यावर अजित गव्हाणे यांचा ‘सेल्फ गोल’

२० वर्षे नगरसेवक असताना स्वत:च्या प्रभागातील समस्यांचे निवडणूक ‘भांडवल’ : भोसरी- दिघी रस्ता प्रश्न गुंतागुतींचा केला अन्‌ समस्याही सोडवता आल्या नाही

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

भोसरी-दिघी रस्ता गंगोत्री पार्क या सोसायटीच्या कॉर्नरपर्यंत सुमारे १८ मीटरचा आहे. सदर रस्ता पुढे ‘बॉटलनेक’ झाला आहे. त्याचे कारण, रस्त्याच्यासमोर प्लॉटिंग करताना त्यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांनी राजकीय वरदहस्तामुळे दिघीकडे जाणाऱ्या रस्त्याचे ‘डायरेक्शन’ बदलले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन रस्ता १८ मीटर न ठेवता अगदी निमुळता ५ मीटर इतका करण्यात आला. २००५ ते २०१० दरम्यान रस्त्याच्या बाजुला प्लॉटिंग करुन विकले आणि काही ठिकाणी गृहप्रकल्प बांधून विकण्यात आला. सोसायटी उभारण्यात आल्या. त्यामुळे रस्ता ‘बॉटलनेक’ झाला, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. 

भोसरीतून दिघीला जाणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक असते. याच रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज चोकअप, खड्डे असे व्हीडिओ तयार करण्यात आले. त्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले अजित गव्हाणे यांची टीमही कामाला लागली आहे.

याबाबत माहिती घेतली असता, सदर रस्ता छोटा आहे. त्यानंतर शेजारी उभारलेल्या सोसायट्यांचे मालक पूर्णपणे राजकीय हेतूने ड्रेनेज लाईनला जागा देत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी कामच करता येत नाही. मोठी रहदारी असल्यामुळे रस्ता बंद ठेवूनही चालत नाही. त्यामुळे ड्रेनेज चोकअपची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. 

ज्या वॉर्ड- प्रभागामध्ये अजित गव्हाणे २० वर्षे स्वत: नगरसेवक आहेत. त्यांच्या मावशी मोहिनी लांडे या याच प्रभागातून प्रतिनिधीत्व करीत होत्या. त्याच प्रभागाच्या प्रतिनिधी असताना त्यांनी अडीच वर्षे महापौरपद भूषवले आहे. अजित गव्हाणे यांना ज्यांनी राजकारणात आणले. ज्यांचे शिष्य म्हणून ते ओळखले जातात. ते माजी आमदार विलास लांडे भोसरी विधानसभा मतदार संघाचे १० वर्षे आमदार राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळातही हा प्रश्न सुटला नाही. कारण, तांत्रिकदृष्टया गुंतागुंत झालेली आहे.

यासह महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात अजित गव्हाणे महाविकास आघाडीचे शहरातील निर्णायक नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष होते. त्यांच्या इशाऱ्याप्रमाणे प्रशासन काम करीत होते. किंबहुना तत्कालीन उपमुख्यमंत्री व महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने शहराची सत्ता चालवत होते. त्यांच्याच प्रभागात अजित गव्हाणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आंदोलन करुन स्टंटबाजी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ‘स्वत:च निर्माण केलेल्या समस्येबाबत अजित गव्हाणे स्वत: विरोधात आंदोलन करणार आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अभ्यासू अजित गव्हाणे यांची प्रचार यंत्रणा भरकटली…?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी २० वर्षे सत्तेत असताना स्वत:च्या वार्डात, प्रभागात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले. त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. मात्र, आता स्वत:च्या प्रभागातील समस्यांबाबत आंदोलन करुन ‘स्टंटबाजी’ करण्याचा प्रयत्न गव्हाणे करीत आहेत. त्यापेक्षा अभ्यासू नेता अशी ओळख असलेल्या गव्हाणे यांनी प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत होते. निवडणुकीच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासन आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना ‘डॅमेज’ करण्याच्या प्रयत्नामध्ये गव्हाणे यांनी आपल्या ‘होमपिच’ वरील स्वत:चे अपयश लोकांसमोर मांडले आहे. याहून आश्चर्चाची बाब म्हणजे, गव्हाणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गव्हाणेंच्या प्रभागातील समस्या सोशल मीडियावर व्हायरल करुन ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

नागरिक काय म्हणतात…? 

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पब्लिसिटी करण्यापेक्षा आपल्या सत्ताकाळात आपण केले? काय करणार आहोत? याबाबत लोकांना माहिती द्यावी. राजकीय रस्सीखेचमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे भांडवल करुन, आंदोलन, सभा, बैठकांचा ‘फार्स’ करुन आम्हाला वेठीस धरु नये. कारण, ‘‘स्थानिक नागरिकांनी सुट्टी घ्यावी… आंदोलनात सहभागी व्हावे…’’ असे ‘मॅसेज’ सोसायटीच्या ग्रुप्समधून फिरवले जात आहेत, अशा प्रतिक्रिया स्थानिक सुशिक्षीत सोसायटीधारक आणि सूज्ञ नागरिकांकडून येत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोशी, चऱ्होली आदी भागामध्ये नागरी समस्या मांडणे. त्यासाठी व्हीडिओ बाईट करणे. समस्यांची थट्टा उडवणे. त्याद्वारे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना ‘ट्रोल’ करणे यापेक्षा अजित गव्हाणे यांची प्रचार यंत्रणा समस्यांवर सोल्युशन काय? याबाबत चर्चा न करता Narrative सेट करण्यासाठी सोशल मीडिया ट्रायल करीत आहे. या उत्साहाच्या भरात अजित गव्हाणे यांच्या प्रचार यंत्रणेने होम पिचवरच ‘सर्जिकल स्ट्राईक’ करीत ‘सेल्फ गोल’ केला आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

गंगोत्री पार्क येथे ‘प्लॉटिंग’ करुन सदनिका विकणाऱ्या नेत्यांनीच या परिसरातील समस्या निर्माण करुन ठेवल्या आहेत. रस्ता करताना ड्रेनेज लाईन, स्ट्रॉमवॉटर लाईन, भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली नाही. आम्ही स्थानिक नागरिक सांगत असतानाही दुर्लक्ष केले. स्वत:च्या प्रभागातील आणि सत्ताकाळातील अपयश आता दुसऱ्याच्या डोक्यावर फोडले जात आहे. म्हणजे ‘‘उलटा चोर कोतवाल को डांटे’’ असाच हा प्रकार आहे.
– सागर गवळी, माजी सभापती, शहर सुधारणा समिती. 

 

नागरिकांना सुविधा मिळाव्यात. यासाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे. नागरी समस्यांबाबत राजकारण न करता समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गंगोत्री पार्क येथील रस्त्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल, असा मला विश्वास आहे. निवडणुकीच्या तोंडावर समस्यांचे भांडवल करुन सामान्य नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य आहे.
– कविता भोंगाळे, सामाजिक कार्यकर्त्या, भाजपा. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button