Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

गिरीश बापट यांना जाऊन तीनच दिवस झाले..अन् पुण्यात झळकले भावी खासदारचे बॅनर्स

जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र, बापट यांना जाऊन तीन दिवस उलटले नाहीत तो पर्यंत पुण्यात भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर्स लागले आहेत.

पुणे भाजप शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असं लिहलेले बॅनर्स लागले आहेत. ते माजी आमदार आहेत. आज १ एप्रिल रोजी जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावले आहेत. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर्सवर लिहलं आहे.

या बॅनर्सवर आता विरोधीपक्षाकडून टीका होत आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती.त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले.जनाची नाही मनाची तरी ठेवा, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button