राज्यात पुढील ३-४ दिवस मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट!

पुणे | उन्हामुळं अंगाची लाहीलाही झाली असताना आजपासून राज्यात पुढील ३ ते ४ दिवस बहुतांशी भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये नगर, पुणे, सातारा, नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून मंगळवारपर्यंत राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याचेही भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगडच्या अनेक भागात येत्या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता देखील हवामान विभागाच्या अंदाजानुसार वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या अवकाळी पाऊसामुळे बळीराजा संकटात आल्याचं पहायला मिळतंय. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असल्याचे सांगतले जाते आहे.
हेही वाचा – Pune | निवडणूकीसाठी पीएमपीएमएल देणार ८१८ बसेस
पुण्याला वादळी वाऱ्याच्या पावसानं झोडपलं!
पुणे आणि आजूबाजूच्या गावात काल संध्याकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे पुणेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुण्यात लोकसभेच्या निवडणुकींचं वारं सुरु आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरु आहे. मात्र या पावसामुळे कालच्या काही सभावर पाणी फेरल्याचं पाहायला मिळालं. आजदेखील पुण्यात अनेक राजकीय नेत्यांच्या सभा आणि रोड शो हणार आहेत. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यापूर्वी जर पुण्याला पावसानं झोडपलं तर सभा आणि रोड शो रद्द होण्याची शक्यता आहे. पुण्यात मतदानाच्या दिवशीदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





