ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज; आमदार शंकर जगताप

योग दिनानिमित्त निरोगी आणि सकारात्मक जीवनाचा संकल्प!

पिंपरी | “शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आजच्या गतिमान युगात लहान वयातच मुलांमध्ये शारीरिक व मानसिक ताणतणाव वाढताना दिसत आहेत. भविष्यातील आरोग्याची गुंतागुंत प्राथमिक स्तरावरच रोखायची असेल, तर शालेय शिक्षणापासूनच मुलांना योगाचे धडे देणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगवी-पिंपळे गुरव मंडल अंतर्गत रविवारी (दि. २१) राजमाता जिजाऊ उद्यान येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आमदार शंकर जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांसोबत योगासने केली.

कार्यक्रमात बोलताना आमदार जगताप म्हणाले की, “देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळे योगाला आज जागतिक स्तरावर एक नवी आणि जाज्वल्य ओळख मिळाली आहे. यंदाचा योग दिन ‘१२ वर्षे जनसेवेची, जनकल्याणाची’ या संकल्पनेने साजरा होत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग चळवळीला मोठी गती मिळाली आहे. फडणवीस यांच्या क्रीडा व आरोग्य धोरणांच्या माध्यमातून योग संस्कृती राज्यातील तळागाळातील नागरिकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचली आहे.”

हेही वाचा

शून्य कचरा संकलन उपक्रमाला नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद!

भावी पिढी सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी शालेय स्तरावर योगाची मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे. लहान वयातच योगाची सवय लागल्यास मुलांची एकाग्रता वाढेल आणि भविष्यात उद्भवणारे गंभीर आजार व आरोग्याची गुंतागुंत सुरुवातीलाच टाळता येईल, यावर आमदार जगताप यांनी विशेष भर दिला.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या शिबिराचे आयोजन नगरसेवक शशिकांत कदम, श्याम जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी महेश जगताप आणि यांनी केले होते. प्रसिद्ध योगशिक्षक मीना पवार यांनी उपस्थितांना प्राणायाम व विविध योगासनांचे प्रात्यक्षिकांसह शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून नियमित योगासने करण्याचा संकल्प केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button