Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे’; विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सभात्याग

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान अशातच पंतनामे झाले नसल्याने विरोधीपक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला आणि पायर्यांवर ठाण मांडत जोरदार निदर्शने केली.
आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे…गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे…ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.





