Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्यानं सोडली साथ

मुंबई : पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच आता राज्यात पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पहायला मिळालं, मात्र आता महायुतीमधल्या घटक पक्षातीलच नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.  शिवसेना शिंदे गटाच्या काही नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत असून, आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसं रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादीतील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंत्री भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय सुरुंग लावण्यास सुरुवात केल्यानंतर, आता सुनील तटकरेंनी देखील शिवसेनेतील मोठे मासे गळाला लावायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व गोगावले यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुतारवाडी येथे हा जाहीर पक्षप्रवेश पार पडला, यावेळी सुनील तटकरे यांनी रमेश मोरे व त्यांच्या सहकार्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले.  यावेळी बोलताना रमेश मोरे यांनी शिवसेनेवर आरोप केले आहेत.

हेही वाचा –  बीडकरांची दिवाळी नवीन घरकुलात… घरकुल बांधणीत बीड जिल्ह्याने रचला नवा विक्रम!

दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी हा पक्षप्रवेश झाला आहे. हा रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर याचं अद्याप कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र दुसरीकडे पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. महायुतीमधीलच अनेक जण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचं पहायला मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button