ऐन दिवाळीत पावसाची एन्ट्री अन् नागरिकांची उडाली तारांबळ, आता पुढचे 4 दिवस पावसाचे….

Rain Update : लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी 21 ऑक्टोबरला पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या मुलांचा हिरमोड झाला. यानंतर आता पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रायगड, रत्नागिरी, ठाणे याशिवाय छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांचीही पळापळ सुरू झाली.
हेही वाचा – महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, नेत्यानं सोडली साथ
दरम्यान, आता सलग चार दिवस म्हणजेच 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी बुलढाणा, लातुर, सातारा, रत्नागिरीसह काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, प्रतितास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.




