उर्फी जावेदच्या कपड्यांवर शर्मिला ठाकरेंची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणाल्या..

मुंबई : उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच ट्रोल होत असते. अनेक जण तिच्या अशा वागण्यावर टीका करतात तर काही तिला पाठिंबा देतात. मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी तर तिच्यावर टीका केलीच आहे पण आता राजकारण्यांचीही तिच्यावर प्रतिक्रिया येऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद अजुनही सुरुच आहे त्यात आता उर्फीच्या कपड्यांवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे.
पनवेल येथे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला या एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी उर्फी जावेदवर विचारलेल्या प्रश्नावर हटके उत्तर दिले आहे. मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही असे उत्तर त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फि जावेद यांच्या वाद सुरू आहेत. त्या संदर्भात शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
सोबतच, मी फक्त उर्फीला इशारा दिला आहे की, महाराष्ट्रात नागडी उघडी फिरू नको, असं सांगणं म्हणजे धमकी नाही. आमचा आक्षेप फक्त उर्फीच्या कपड्यावर आहे. इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे माझा अजूनही तिला इशार आहे की, उर्फी जावेदने कपडे घालून रस्त्यावर फिरावे. मला कोण काय बोलते याचा मला फरक पडत नाही. माझ्यामुळे उर्फीला प्रसिद्धी मिळते म्हणून मी बोलायचं नाही असं होणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.





